जिल्हा क्रिकेट अध्यक्षपदी अनिरूध्द पाटील

। पेण । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची पंच वार्षिक निवडणूक पेण येथील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात पार पडली. यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अनिरूध्द पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, कार्याध्यक्षपदी चंद्रकांत मते आणि सेक्रेटरी म्हणून प्रदिप नाईक यांची बिनविरोधच निवड झाली आहे.

यावेळी एकूण 17 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये कौस्तुभ जोशी, जयंत नाईक, समीर मसुरकर, पंकज पंडित, संतोष भोईर, राजेश पाटील, सतीश पाटील, बशीर चीचकर, किरीट पाटील, सुनील घरत, यशवंत साबळे, संदीप पाटील, गणेश कडू, प्रशांत ओक, या सर्वांचा समावेश आहे. ही निवड 2024 ते 2029 या पाच वर्षासाठी झालेली आहे. यावेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये सभेचे अध्यक्षपद प्रकाश शिंगरूत तर निवडणूक अधिकारी म्हणून संजय तावडे, अरूण शिंदे यांनी काम पाहिले. सेक्रेटरी म्हणून प्रशांत ओक यांनी पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. या निवडणूक प्रक्रियेसाठी रायगड जिल्हयातील मोठया प्रमाणात क्रिकेट असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन नवनिर्वाचित सेक्रेटरी प्रदिप नाईक यांनी पार पाडले. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

Exit mobile version