नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर नव्या पक्षासह नावाची घोषणा

। जम्मू-काश्मीर । वृत्तसंस्था ।

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आझाद यांना आपल्या नव्या पक्षाची घोषणा यापूर्वीच करायची होती. पण आज नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर नव्या पक्षासह नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे घोषित करण्यात आले आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले आहे.

यावेळी बोलताना आझाद म्हणाले की, पक्षाची विचारधारा नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील. आझाद यांनी यापूर्वीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला असून, यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्द्यांचा समावेस आहे.

Exit mobile version