वार्षिक पारितोषिक सोहळा

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गुणगौरव करणे हा हेतु आपल्या प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.कल्याणी नाझरे यांनी मांडला.प्रा.उल्हास खोपकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय, प्रा.पंकज गमे यांनी परीक्षा विभाग, डॉ. कल्याणी नाझरे यांनी सांस्कृतिक विभाग, उप प्राचार्य किशोर लहारे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर प्रा. सागर कुंभार यांनी क्रीडा विभागाचा वार्षिक अहवालसादर केला. प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी विद्यार्थ्यांना कंफर्टेबल झोनमधून बाहेर येऊन आपल्या भवितव्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा असा सल्ला आपल्या मनोगतांत दिला.

Exit mobile version