। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथील रॉयल गार्डन मंगल कार्यालयात (दि.25) रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष भगवान घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी घरत यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचाली विषयीची माहिती आपल्या प्रास्ताविकात विशद केली.उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या यशस्वी वाटचाली बद्दल संस्थेच्या पारदर्शक कारभाराबद्दल गौरवोद्गार काढले. शिक्षक पतपेढी ही शिक्षकांची कामधेनू असते. ती सर्वांच्या सहकार्यानेच आणि विश्वासानेच यशस्वी वाटचाल करू शकते, असे मत गटशिक्षणाधिकारी दौड यांनी व्यक्त केले. तसेच, मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सभेच्या दुसर्या सत्रात सन 2022-23 या आर्थिक वर्षातील सभेचे इतिवृत्त वाचन राजेंद्र पाटील यांनी केले.विषयपत्रिकेप्रमाणे विषयांचे वाचन घरत यांनी केले.
या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून कर्जत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष दौड, माजी सभापती मनोहर थोरवे, रा.जि. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे तसेच रेश्मा धुमाळ, राजेंद्र पाटील, राजेश सुर्वे, नरेंद्र गुरव, नरेश सावंत, उमेश महाडेश्वर, रविंद्र पालकर, निलेश साळवी, सुशील वाघमारे, जितेंद्र बोडके, देवानंद गोगर, वैभव पिंगळे, प्रमोद भोपी, राजेंद्र फुलावरे, बालाजी गुबनरे, प्रफुल्ल पवार, प्रतिभा पाटील, दयानंद अंजर्लेकर, सुरेंद्र शिंदे, संदेश पाटील आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.