कमळ पतसंस्थेची वार्षिक सभा

| अलिबाग | प्रतिनिधी |

कमळ नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग या पतसंस्थेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा होरायझन हॉल – बुरुमखाण अलिबाग येथे संस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस खूप मोठ्या प्रमाणावर सभासदांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्षांनी सभेचे सुरुवातीस दुखवट्याचा ठराव मांडून सभेचे कामकाजास सुरुवात केली. सभेत विषयपत्रिकेनुसर 17 ठराव संस्थेच्या संचालक मंडळ सदस्यांद्वारे सादर करण्यात आले. सर्व ठराव हे एकमताने मंजूर करण्यात आले.

अप्पर निबंधक तसेच पणन संचालक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक, रायगड प्रमोद जगताप , बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, सहकार तज्ञ गणेश निमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे,उपाध्यक्ष नंदकुमार चाळके, सचिव गीतांजली ओक तसेच डेप्युटी सीईओ रंजन पाटील यांचेसह सर्व संचालक मंडळ सदस्य सभेस उपस्थित होते. सभेचे कामकाजानंतर सहकार तज्ञ गणेश निमकर यांचे सहकारी बँकिंग संकल्पना या पुस्तकाचे अनावरण मा. अप्पर निबंधक श्री. शैलेश कोतमिरे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. गणेश निमकर यांचेसह सहकार क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version