| अलिबाग | वार्ताहर |
सावतामाळी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष श्री रमेश भास्कर नाईक यांचे अध्यक्षेतेखाली क्षात्रैक्य समाज हॉल कुरूळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राज्य सहकारी संघाचे एस.बी. वाटाणे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. सभेच्या अजेंडया वरील 13 विषयावर सविस्तर चर्चा झाली. शेवटी उपाध्यक्ष श्री जगदिश कवळे यांनी आभार मानले. सभेला संचालक प्रकाश पाटील, श्रीकांत नाईक, पुष्पा पडते, दयाराम अलिबागकर, हर्शल नाईक, अजय राऊळ, नारायण भगत, अतुल वर्तक, धनंजय बना, आशा घरत, तज्ज्ञ संचालक परशुराम म्हात्रे व शहाजी शिंदे कर्मचारी वर्ग आणि मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.