| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या सभेसाठी अध्यक्षस्थानी महेंद्र भगत होते. सन 2022- 23 या आर्थिक वर्षात संस्थेने जे कामकाज केले त्याचा संपूर्ण अहवाल उपस्थित सभासदांसमोर यावेळी मांडण्यात आला. तसेच सभासदांच्या कर्ज संरक्षण योजना कवच पाच लाखापर्यंत देण्याचा ठराव घेत, सभासदांच्या पदविका धारक पाल्यांना शैक्षणिक कर्ज कमी व्याज दरात देण्याचे या संस्थेचे मार्गदर्शक तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँक प्रतिनिध आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत प्रस्तावित करण्यात आले आहे.
यावेळी सभासदांच्या इयत्ता 10 वी, 12 वी आणि पदवी परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या पाल्ल्यांचा गौरव संस्थेच्या वतीने तसेच संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष महेंद्र भगत यांनी संचालक मंडळ व सभासद यांचा पतसंस्थेबद्दलचा विश्वास व सहकार्य यामुळे आज संस्थेचा नाव लौकिक वाढलेला आहे, हे सर्वांना अभिमानास्पद आहे. संस्थेची अशीच प्रगती वाढावी यासाठी सभासद संख्या वाढविणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र पुगांवकर, ऑ. सेक्रेटरी किरण रावळ, संचालक समीर अधिकारी, राजेंद्र गायकवाड, सुरेश जांभळे, कैलास चौलकर, निलेश कार्लेकर, सुदिन कांबळे, कुसुम जुईकर, स्नेहल मोरे, सुनिल घुटे, दिपक देवरुखकर, वैभव पाटील, बळीराम धनावडे, तज्ञ संचालक अमरदिप ठोंबरे, सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.