| अलिबाग | प्रतिनिधी |
जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग प्रगतीच्या शिखरावर आहे. पारदर्शी आणि जलद कारभारामुळे ही पतसंस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. सातत्याने या पतसंस्थेस ऑडीट वर्ग ‘अ’ मिळत आला आहे. यासाठी विद्यमान संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी वृंद यांचे सातत्याने सहकार्य लाभले आहे, असे प्रतिपादन जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद चव्हाण यांनी केले.
जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था, अलिबागची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 27 ऑगस्ट रोजी इस्रायल आळी, अलिबाग येथील हॉटेल चिरागच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद चव्हाण, उपाध्यक्ष अभय म्हामुणकर, सचिव मंगेश म्हात्रे, खजिनदार गीता धर्माधिकारी, संचालक अनिल गोळे, सुचिता चव्हाण, सिद्धांत चव्हाण, तज्ज्ञ संचालक रोहन चिमणे, निवृत्त शासकीय लेखा परीक्षक- श्रेणी 1 संदीप गोठीवरेकर, व्यवस्थापिका शिल्पा देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद चव्हाण बोलत होते. त्यांनी पुढे म्हटले की, पतसंस्थेची नवीन अद्ययावत इमारत पुढील काही वर्षात उभी करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या सभेत संचालक अनिल गोळे यांनी प्रारंभी संस्थेचा अहवाल वाचन केला. तर निवृत्त शासकीय लेखा परीक्षक- श्रेणी 1 संदीप गोठीवरेकर यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. याच सभेत अध्यक्ष ॲड. मिलिंद चव्हाण, निवृत्त शासकीय लेखा परीक्षक- श्रेणी 1 संदीप गोठीवरेकर, साहित्यिक उमाजी केळुसकर यांचा सत्कार आणि ठेवीदार, कर्जदार, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला. या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी 300 सभासद उपस्थित होते. ही वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी सर्व संचालकांबरोबरच लेखनिक जयेश सुतार, प्राची जयेश सुतार, मदतनीस जगदीश म्हात्रे यांनी परिश्रम घेतले.