। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रायगड जिल्हा सेवानिवृत्तांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नढाळ-चौक येथील श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात दि.29 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या सभेसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी संस्थेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण टेंभे, रायगड जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, संस्थेचे पदाधिकारी वावेकर व अन्य पदाधिकाऱी उपस्थित होते. सभेच्या कामकाजात नियमित कामकाजाव्यतिरिक्त लक्ष्मण टेंबे, मढवी यांनी संघटना शक्ती व यश या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी मार्गदर्शन करतांना श्रीक्षेत्र पंचायतन मंदिराच्या लोकोपयोगी उपक्रमांबद्दल मोलाची माहिती सांगितली.