आरएसपीची वार्षिक सभा संपन्न

। अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शेगाव जि.बुलढाणा येथे संपन्न झाली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी संजय शेंडे होते. व्यासपिठावर पितांबर महाजन, मधुकर तिडके, हिराजी पाटील, अनिल शेजाळे, फाळके, पोहरे, श्रीकांत पाटील, दिलीप स्वामी, मणीलाल शिंपी, महादेव क्षिरसागर, ढाकूळकर, बागडे, किनगे, कैलास घोडे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला नेवासा जि. अहमदनगर येथे झालेल्या मागील सभेचे इतिवृत्त व मागील वर्षीचा जमा-खर्च वाचून दाखविला. त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यावेळी अनिल शेजाळे यांनी ही संघटना पोलीस खात्याने आवश्यकतेनुसार निर्माण केली असून आजमितीस संघटनेस साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्यस्थितीत या संघटनेचे कामकाज शासनाच्या पोलीस खाते व शिक्षण खाते यांचे अंतर्गत चालविले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयात वाहतुकीचे नियम पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, पोलीससदृष्य असलेल्या आपल्या वर्दीचा मान राखून अधिकाराचा दुरुपयोग केला जाऊ नये असे, आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version