रत्नागिरी एसटी आगारातील आणखी 58 जण निलंबित

। रत्नागिरी । वार्ताहर ।
एसटी कामगारांचे सलग दहाव्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाच्या दबावतंत्रामुळे जिल्ह्यात आज 58 कर्मचार्‍यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे एकूण निलंबितांची संख्या 85 झाली. आज आणखी 44 कर्मचारी कामावर हजर झाल्याने जिल्ह्यात 143 कामगार हजर आहेत. कंत्राटी कामगारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने उद्या (ता. 18)पासून ते हजर होऊ शकतात.
शासनाकडून दबाव तंत्राचा वापर सुरू असला, तरीही जिल्ह्यातील कर्मचारी अजूनही ङ्गबंदफवर ठाम आहेत. आतापर्यंत साडेचार हजार कर्मचार्‍यांपैकी 143 जण सेवेत रुजू झाले. ङ्गबंदफमध्ये सहभागी झालेल्या 85 कर्मचार्‍यांचे आतापर्यंत निलंबन करण्यात आले आहे.
यात सुरुवातीला रत्नागिरी आगारातील 18 व राजापूरमधील नऊ कर्मचार्‍यांना निलंबित केले होते. कार्यालयीन कामात व्यत्यय आणणे तसेच या कामगारांमुळे अन्य कामगार कामावर न येणे अशी कारणे सांगत आज जिल्ह्यात कामगारांना निलंबनाची नोटीस देण्यात आली. यात मंडणगड आगारातील सात, दापोली 18, खेड सहा, लांजा 12, गुहागर चार, देवरुख पाच, चिपळूण सहा अशा एकूण 58 जणांचा समावेश आहे. आज रत्नागिरी व राजापूरमधील कोणालाही निलंबित केलेले नाही.
शासनाकडून एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. कर्मचारीही राज्य शासनात विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असून, ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाहीत, अशा पवित्र्यात आहेत. त्यामुळे शासनाकडून या कर्मचार्‍यांना ङ्गबंदफमधून माघार घेण्यासाठी काही तासांचा अल्टीमेटम देऊन प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Exit mobile version