बुलीबाई प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बुलीबाई अ‍ॅप प्रकरणी आणखी एका आरोपीला ओडिशातून अटक करण्यात आली आहे. नीरज सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावी आहे. याआधी या प्रकरणातील विशालकुमार झा, श्‍वेता सिंह, मयंक रावत, नीरज बिश्‍नोई या चार आरोपींना अटक केली होती. मुस्लिम समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह तपशील या बुलीबाई पमध्ये आहे. पची निर्मिती आपण केल्याची कबुली या आरोपींनी दिली होती. बुलीबाई प्रकरणात पाच ट्विटर अकाऊंट पोलिसांना मिळाले आहेत. त्यापैकी तीन अकाऊंट श्‍वेता सिंग चालवत होती. एक अकाऊंट विशाल कुमार झा चालवत होता. 31 डिसेंबर 2021 रोजी गिटहबवर बुलीबाई प अपलोड करण्यात आले. यात शीख समुदायांच्या नावाने अकाऊंटस् तयार करून मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात येत होते. यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळे घडवून आणले आहे का, याचा पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच संबंधीत एक एक आरोपी पकडत असल्याने या प्रकरणाचा लवकरच निकाल लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version