अनुजची सुवर्ण कामगिरी

। पाली । वार्ताहर ।
गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे झालेल्या इंटरकॉलेज पिंच्याक सिलॅट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये अनुजने एलकेसी कॉलेज जालंधरचे प्रतिनिधित्व केले होते. येत्या 24 व 26 मे रोजी युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू येथे होणार्‍या ऑल युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी गुरुनानक देव युनिव्हर्सिटीच्या संघात त्याची निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांचे अनुजला मार्गदर्शन लाभले आहे.

Exit mobile version