खोपोली न.प.च्या प्रशासकपदी अनुप दुरे

खोपोली | प्रतिनिधी |
नगरपालिकेची मुदत दि.30 जानेवारी रोजी संपली असून, निवडणुकीची तारीख निश्‍चित नाही आणि निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता असल्यामुळे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची खोपोली नगरपालिकेवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नवी मुंबईचे उपायुक्तपदी यशस्वी काम करणारे अनुप दुरे यांची खोपोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाल्यावर कोविडच्या पार्श्‍वभूमिवर पालिकेत आर्थिक आडचणी होत्या. मात्र दुरे यांनी नगराध्यक्षा, नगरसेवक यांची प्रशासनाची सांगड घालत बहुसंख्य कामे केली. निवडणुका होईपर्यंत प्रशासकपदी मुख्याधिकारी अनुप दुरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Exit mobile version