शासनाच्या उदासीन धोरण; पाणी योजनांना फटका

निधी असूनही कामे रखडली, नागरिकांमध्ये संताप


| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन 2018-19 या वर्षात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र निधी असूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे सदरच्या योजनांचे काम रखडले आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून पाणीपुरवठा योजनांची कामे लवकर सुरु करावीत अशी, मागणी जोर धरत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावातील नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जल जीवन मिशन योजना सुरु केली. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमांर्गत सन 2018-19 या वर्षात सुमारे 68 लाख 34 हजार 064 रुपये खर्चाची वेश्वी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पनवेल यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आला. परंतु सदर योजनेचा ठेका घेणारा ठेकेदार हा अर्धवट काम सोडून गेल्याने आज योजनेचे काम अर्धवट स्थितीत आहे. या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी वेश्वी गावातील रहिवासी करत आहेत.

त्यातच उरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागले आहे. वेश्वी ग्रामपंचायतप्रमाणे बांधपाडा, विंधणे, चिरनेरसह तालुक्यातील अन्य ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी आहे, मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने रेंगाळले आहे.

उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. चिरनेर गावातील पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सुरू आहे. फुंडे ग्रामपंचायतीचे काम पुर्ण झाले आहे, तर बांधपाडा, विंधणे येथील कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनांची प्रक्रिया सुरू आहे.

भटेश चव्हाण, पाणी पुरवठा, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग उरण- पनवेल
Exit mobile version