ठेकेदारांच्या शोधार्थ अधिकारी
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या माध्यमातून सन 2018-19 या वर्षात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वेश्वी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली परंतु पाणी पुरवठा योजनेचा ठेका घेणारा ठेकेदार पळून गेल्याने सदरच्या योजनेचे काम रखडलेल्या स्थितीत पडून राहिले आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे उरण तालुक्यातील अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना बंद पडलेल्या अवस्थेत पडून राहिल्या आहेत. वेश्वीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमानंर्गत सन 2018-19 या वर्षात सुमारे 68 लाख 34 हजार 064 रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय ग्रामीण पाणी पुरवठा राजिप उपविभाग पनवेल यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आला. परंतु सदर योजनेचा ठेका घेणारा ठेकेदार हा अर्धवट काम सोडून गेल्याने योजनेचे काम अर्धवट स्थितीत पडून राहिल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत आहे. तरी या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी वेश्वी गावातील रहिवासी करत आहेत.
ठेका घेणारा ठेकेदार वेश्वी गावातच येत नाही.त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद स्थितीत पडून राहिले आहे.सदर योजनेचे काम मार्गी लागावे अशी आमची मागणी आहे.
संदीप कातकरी, सरपंच वेश्वी
सध्या ठेका घेणारा ठेकेदार गायबच झाला आहे.त्यासंदर्भा जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप यांना माहिती देण्यात आली आहे.ठेकेदार प्राप्त झाल्यानंतर रेंगाळत पडलेले काम मार्गी लावण्यात येणार आहे.
भटेश चव्हाण, उप अभियंत