शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन

| रत्नागिरी | वृत्‍तसंस्था |

शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यामध्ये शेततळे खोदण्यासाठी आणि अस्तरीकरणासाठी प्रत्येकी 75 हजार देण्यात येतात. याबाबतची अधिक माहिती महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. योजनेत शेतकऱ्यांना 15 बाय 15 चे शेततळे खोदण्यासाठी 18 हजार 621 रुपये अनुदान मिळते तसेच अस्तरीकरणासाठी 28 हजार 275 रुपयांचे अनुदान मिळते, 20 बाय 15 चे शेततळे खोदण्यासाठी 26 हजार 674 रुपये आणि अस्तरीकरणासाठी 31 हजार 598 रुपये अनुदान मिळते.

20 बाय 20 चे शेततळे खोदण्यासाठी 38 हजार 417 रुपये आणि अस्तरीकरणासाठी 41,218 रुपयांचे अनुदान मिळते. 25 बाय 20 चे शेततळे खोदण्यासाठी 50 हजार 61 रुपयाचे अनुदान मिळते. 25 बाय 25 चे शेततळे खोदण्यासाठी 65,194 रुपयांचे अनुदान मिळते. 20 बाय 25 चे शेततळे खोदण्यासाठी 75 हजार रुपयांचे अनुदान मिळते. 30 बाय 30 चे शेततळे खोदण्यासाठी 75 हजार रुपयांचे, अस्तरीकरणासाठी 75 हजार रुपयांचे असे दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

संकेतस्थळावर शेतकरी एकाच वेळी अर्ज करू शकतात. लॉटरी पद्धतीने योजनेसाठी शेतकऱ्याची निवड होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याने एकदा केलेला अर्ज ग्राह्य धरला जातो. म्हणजेच शेतकऱ्यांला प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही आणि वारंवार अर्ज करावा लागत नाही. दरमहा प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्याची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. त्यामुळे सर्वांना लाभ घेता येतो.

Exit mobile version