। तळा । प्रतिनिधी ।
ज्या नागरिकांच्या वस्तू चोरी झालेल्या आहेत अशा नागरिकांनी आपल्या चोरी झालेल्या मुद्देमालाची ओळख पटवण्यासाठी तळा पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन तळा पोलिसांकडून करण्यात आले आहे. 6 डिसेंबर 2014 रोजी तळा पोलिसांनी आरोपी महेश रामभाऊ येरूणकर व आरोपी भावना महेश येरूणकर या दोन्ही आरोपींना चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. या आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणगाव न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल हा तळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून यामध्ये सोन्याच्या 15 व चांदीच्या 26 वस्तूंचा समावेश आहे. तरी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल कोणाच्या मालकीचा असल्यास तळा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन तळा पोलिसांकडून करण्यात आले आहे.