रेवदंडा ग्रामपंचायतीत प्रशासकाची नेमणूक

। रेवदंडा । वार्ताहर ।

सरपंचपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपून, मुदत संपल्याने रेवदंडा ग्रामपंचायतीच्या कारभार शासकीय प्रशासकाचे हाती जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांचे आदेशाने सोपविण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनाच्या राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीत प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करण्यात येते. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासन स्तरावरील अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले आहेत.

26 जुलै रोजी रेवदंडा ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने पंचायत विस्तार अधिकारी दयाळू भिका राठोड यांची रेवदंडा ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक दिली आहे.

Exit mobile version