खारपाटील यांची नियुक्ती

| उरण | वार्ताहर |

पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्यांची सभा रविवारी (दि.7) श्रीमती बारकुबाई पाटील विद्यालय रोडपाली येथे संपन्न झाली. यावेळी काही जणांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात येऊन निवडपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच, मिलिंद खारपाटील यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंडित धायगुडे, आत्माराम शेठ पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अशोक म्हात्रे, राम जाधव, डॉ. वैभव पाटील, डॉ. शैलेश ठाकूर, राजेंद्र लकेश्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version