• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?

Antara Parange by Antara Parange
June 27, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शंभर रुपयांच्या रिचार्जसाठी 20 ते 50 रुपये अधिक वसुली
महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक?

| रायगड | प्रमोद जाधव |

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजनेतून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत असताना, कार्ड नोंदणी आणि रिचार्जच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शंभर रुपयांच्या रिचार्जवर जीएसटीच्या नावाने पाच रुपये वजा होत असतानाच काही एजन्सींकडून 20 ते 50 रुपये अधिक वसूल केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एसटी महामंडळाने कागदी ओळखपत्राच्या जागी 2016 मध्ये स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. मात्र, अवघ्या सात वर्षांत ती योजना बंद पडली. त्यानंतर आता प्रवासातील पारदर्शकता वाढविणे, डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि एसटी प्रवास कॅशलेस करण्याच्या उद्देशाने एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून एसटी महामंडळाने तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक आधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.

रायगड जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेसाठी खासगी एजन्सींची नियुक्ती करण्यात आली असून, अलिबाग, पेण, कर्जत, उरण, पनवेल, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा आणि माणगाव या ठिकाणी सुमारे 30 हून अधिक एजन्सीमार्फत नोंदणीचे काम सुरू आहे. रायगड विभागाच्या अखत्यारित 24 एजन्सी कार्यरत असून, आठ आगारांतील 11 बसस्थानकांमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत. काही एजन्सी सकाळी 8 ते 11, तर काही सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत कार्यरत आहेत.

महिलांच्या मोफत प्रवास योजनेमुळे एनसीएमसी कार्डसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बसस्थानकांसह खासगी एजन्सींमध्ये नोंदणीसाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 40 हजार महिलांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे 20 हजार लाभार्थ्यांना कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, कार्ड नोंदणीपासून ते प्रत्यक्ष कार्ड मिळेपर्यंत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

या कार्डासाठी अधिकृत शुल्क 199 रुपये असताना अनेक ठिकाणी थेट 200 रुपये घेतले जात आहेत. त्यानंतर कार्ड सक्रिय करण्यासाठी शंभर रुपयांच्या रिचार्जवर 120 ते 150 रुपये आकारले जात असल्याची तक्रार आहे. यामध्ये शंभर रुपयांच्या रिचार्जमधून पाच रुपये जीएसटी म्हणून वजा केले जातात. त्यानंतर काही एजन्सींकडून 20 ते 50 रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याने लाखो रुपयांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराकडे एसटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दोषी एजन्सींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

जुन्या योजनेचे हजारो कार्ड आजही धूळ खात
एसटी महामंडळाने 2016 मध्ये कागदी ओळखपत्राच्या जागी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. अवघ्या 50 रुपयांत मिळणारे हे कार्ड प्रवाशांसाठी वापरण्यास सोयीचे ठरत होते. हजारो प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, आर्थिक कारणे पुढे करत संबंधित कंपनीने अवघ्या सात वर्षांत ही योजना बंद केली. परिणामी, जुन्या योजनेची हजारो स्मार्ट कार्डे आजही विविध एसटी बसस्थानकांमध्ये पडून असून, त्यांचा कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

एनसीएमसी कार्ड योजना रायगड विभागात सुरू करण्यात आली असून, 24 हून अधिक एजन्सीमार्फत नोंदणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 40 हजार जणांनी नोंदणी केली असून, 20 हजार लाभार्थ्यांना कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. एजन्सींना प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम आकारू नये, अशा तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही एजन्सी नियमबाह्य पद्धतीने जादा पैसे घेत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.

– रोशन भोईर, एसटी महामंडळ, रायगड विभाग

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncmc cardnewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsst
Previous Post

भाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी: उद्धव ठाकरे

Next Post

कारचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उरणमध्ये ‘बीएलओ घरोघरी’चा फज्जा
उरण

उरणमध्ये ‘बीएलओ घरोघरी’चा फज्जा

July 21, 2026
द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे
उरण

द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे

July 21, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल महापालिका घेणार वर्गखोल्या भाड्याने

July 21, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
पनवेल

गाढी नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह

July 21, 2026
कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले
पनवेल

कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले

July 21, 2026
कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू
sliderhome

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

July 21, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

कारचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?