तळे प्रा.आ. केंद्रात दोन अधिकार्‍यांची नियुक्ती

तळे । वार्ताहर ।
तळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवाडकर यांची बदली झाली. त्यामुळे या ठिकाणी असे वैद्यकीय अधिकारी असे कोणीच नव्हते. पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांचे प्रयत्नातून तळे प्रा.आ. केंद्र येथे डॉ.गजेंद्र मोघे (किनवाट) व डॉ. संदिप सांगाडे (पनवेल) हे नियुक्त झाले आहेत. तळे प्रा. आ. केंद्राला दोन डॉक्टर लाभल्यामुळे या तालुक्यातील आरोग्य सेवेला बळकटी प्राप्त होणार असून रुग्णांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा मिळणार आहे.
दोन वैद्यकीय अधिकारी हजार झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात नव्याने निर्माण झालेले महागाव आणि मांदाड या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे त्या परिसरातील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल. दरम्यान रुग्णांना येथे आरोग्य सेवा व्यवस्थित मिळेल. या दोन्ही वैद्यकीय अधिकारी वर्गाकडून अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत.

Exit mobile version