बीडीओपदी वाठारकर यांची नियुक्ती

| उरण | वार्ताहर |

उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी एस.पी.वाठारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी (दि.10) पदभार स्वीकारला. हे पद गेली अनेक महिने रिक्त होते. खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.एच.रजपूत हे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत होते.

वाठारकर यांनी पदभार स्वीकारताच रजपूत यांच्या सह उरण पंचायत समितीचे अधिकारी, अभियंता, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version