खा.संजय राऊतांकडून अलिबाग वकिल क्रिकेट संघाचे कौतुक

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा सुरू झाला आहे त्यात नाशिकमध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. याचे औचित्य साधून संजय राऊत त्यांनी महाराष्ट्रातील वकिलांच्या सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा आढावा घेतला. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात असताना अलिबागच्या वकिलांच्या क्रिकेट संघाची त्यांनी भेट घेवून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अलिबाग सी-हॉक्स अ‍ॅडव्होकेट्स क्रिकेट संघ हा महाराष्ट्रातील पहिल्या चार संघापैकी एक संघ असल्याने स्पर्धेत अलिबाग संघाची प्रमुख दावेदारी प्रत्येक वर्षी असते. यावर्षी देखील अ‍ॅड.महेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अलिबागच्या वकिलाचा संघ दमदार कामगिरी करत आहे.एकूण 78 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून अलिबाग सी-हॉक्स अ‍ॅडव्होकेट्स क्रिकेट संघ हा सुपर 16 मध्ये दाखल झाला आहे. सदर स्पर्धा ही रविवारी (दि. 26) ला सुरु झाली असून 2 जानेवारी 2021 पर्यंंत आयोजित केली आहे.

Exit mobile version