| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, गटनेते नितिन सावंत, बांधकाम सभापती राहुल डाळींबकर, पाणी पुरवठा सभापती प्राची डेरवणकर,महिला बाल सभापती विशाखा जिनगरे, मागासवर्गीय कल्याण वैशाली मोरे, उपसभापती संचिता पाटील तसेच नगरसेविका, नगरसेवक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी मध्ये पहिल्या तीन क्रमांकात विशेष गुण मिळविलेल्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून कौतुक करण्यात आले.तर सुवर्ण महोत्सवी वर्षात श्रीनगर ते खारदुंगला ही सायकल मोहीम करून आलेल्या कर्जत मधील प्रकाश पटवर्धन, श्रीराम फाटक, अमित गुरव, भावेश ठक्कर, विशाल गायकवाड, गौरव फाटक यांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र लाड यांनी केले.