| मुरूड | वार्ताहर |
मुरुड मध्ये सर्वात मोठा श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा येथील स्व नारायण नाना खोत भंडारवाडा यांचे कडे 130 वा श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सात दिवस श्री कृष्ण जन्माष्टमी पर्यंत ज्ञानेश्वर पारायण घरी चालू आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी व प्रसाद घेण्यासाठी येत असतात.
तसेच नानांची नात मृणाल खोत/ गुरव हिने ज्ञानेश्वरीचे स्वहस्ताक्षरातील लिखाण पूर्ण केले आहे. गुरुवारी 18 ऑगस्टला रात्री श्री कृष्ण जन्माष्टमी समारंभ होणार आहे. या दिवशी श्री कृष्णाच्या जीवनावर आधारित सुंदर देखावा चित्र उभारण्यात येणार आहे. रात्री 12:30 वा जन्मकाळ होईल नंतर दही-पोहे चा प्रसाद होईल त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा तसेच दि 19 रोजी गोपाळ कालाच्या दिवशी दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे खोत परिवारातर्फे सांगितले आहे.