पोलीस निरीक्षकाकडून पोलीस पाटलांच्या कामाचे कौतुक

| पाली | वार्ताहर |

रायगड लोकसभेची निवडणूक (दि.7) मे ला सुधागड तालुक्यातील. सर्व गाव वाड्यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. यामध्ये गावातील पोलीस पाटील यांनी या निवडणुकीत मोलाचे सहकार्य केले. आपल्या गावातील मतदान केंद्रावर बाहेरून आलेले सर्व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांना सहकार्य करून त्यांनी आपली जबाबदारी चौक पणे निभावली. त्यांच्या या कामाची दखल घेत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांचे पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी कौतुक करून अभिनंदन केले.यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पीएसआय भास्कर गच्चे , आदीसह तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात 60 % मतदारांनी आपला हक्क बजावला. या निवडणूक प्रक्रियेत सुधागड तालुक्यातील पोलीस पाटील व्यवस्थापक म्हणून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आभार ही मानले.

Exit mobile version