गोव्याला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा
। कर्नाटक । वृत्तसंस्था ।
अर्जुन तेंडुलकरने गोवा क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना सामन्यात एकूण नऊ बळी घेतले. पहिल्या डावात त्याने पाच तर दुसर्या डावात अर्जुनने चार नऊ घेतले. अर्जुन हा एक वेगवान गोलंदाज असून त्याच्या गोलंदाजीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. डावखुरा वेगवान गोलंदाज सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत खेळत आहे. जिथे त्याने गोव्याकडून खेळताना कर्नाटक संघाविरुद्ध भेदक गोलंदाजी केली. या रेड बॉल स्पर्धेत अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
आयपीएलमध्येमुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार्या अर्जुनच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू फेल ठरले. अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. या डावखुर्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात केवळ 41 धावा देत 5 बळी घेतले. केएससीए इलेव्हन संघाला पहिल्या डावात केवळ 103 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गोवा क्रिकेट असोसिएशन संघाने पहिल्या डावात 413 धावांची मोठी मजल मारली. अभिनव तेजरानाने 109 धावांची खेळी केली. मंथन खुटकरने 69 धावांची खेळी केली तर अर्जुन तेंडुलकरने 18 धावांचे योगदान दिले
दुसर्या डावात अर्जुन तेंडुलकरने पुन्हा आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना गुढघे टेकायला भाग पाडले.