। उरण । वार्ताहर ।
हल्ली मोठ्या प्रमाणात परिवारात कोणत्या ना कोणत्या कारणाने दुरावा निर्माण होत चालला आहे. मात्र, पाणदिवे गावातील नरेश मोकाशी यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवात रुढी परंपरांची सांगड घालून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला एका छत्राखाली आणून ठेवण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन मा. आमदार मनोहर भोईर यांनी पाणदिवे गावातील नरेश मोकाशी कुटुंबाच्या गणेशोत्सवा प्रसंगी दर्शन घेताना व्यक्त केले. यावेळी मोकाशी कुटुंबांनी मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीने आपल्या दहा दिवसांच्या गणेशाला वंदन करून मोठ्या अंतःकरणाने निरोप दिला.