| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक सुमारे 200-300 मीटर दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत जवानांची नावे आहेत. रविवारी जम्मूहून श्रीनगरला लष्काराचा ताफा जात असताना ही घटना घडली.
रविवारी रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरल्याने भीषण अपघात झाला. ट्रक खोल दरीत कोसळल्याने तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, 4 जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील एसके पायीन भागात सहा जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता आणि दोन गंभीर जखमी झाले होते.