रेल्वे कर्मचार्‍यावर हल्ला करणारे जेरबंद

। पनवेल । वार्ताहर ।
नेत्रावती एक्सप्रेसमध्ये खाद्य पदार्थ विक्री करण्यास मनाई केल्याचा राग मनात धरुन नेत्रावती एक्सप्रेसच्या पेंट्री कारमध्ये घुसून तेथील तीन कर्मचाऱयांवर हल्ला करुन 45 हजाराची रोख रक्कम लुटून फरार झालेल्या आरोपींना पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

किशन जव्हारलाल गुफ्ता (29), अली कल्लू खान (26), भरत रामु पवार (27), हरेकृष्ण धानप्पा बनारसे (24) अशी या आरोपींची नावे आहेत.लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटलेल्या नेत्रावती एक्सप्रेस गाडीमध्ये चिफ्स केक, बिस्कीट व स्नॅक्स विकण्यासाठी घुसलेल्या अनधिकृत फेरीवाल्याला नेत्रावती एक्सप्रेस मधील पेंट्रीकार मधील कर्मचार्यांनी हटकले होते. या कारणावरून अनधिकृत फेरीवाला व पेंट्री कारमधील कर्मचार्यांमध्ये वादावादी झाल्यानंतर पेंट्रीकार मधील कर्मचार्यांनी त्याला गाडीतील टीसीच्या ताब्यात दिले होते. याच गोष्टीचा सदर फेरीवाल्याला राग आल्याने त्याने सदर गाडी पनवेलजवळ आली असताना, आपल्या चार साथीदारासह सदर एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये घुसून पेंट्री कारमधील कर्मचार्यांवर चाकूने हल्ला केला होता.

बबलु मोहम्मद अशरफ राईन (24) याला पकडून पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.त्याच्याकडून त्याच्या साथीदारांची माहिती मिळाताच त्याच्या चारही साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली आहे.

Exit mobile version