। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील अष्टमी येथील वरचा मोहल्ला येथे सोमवारी (दि.17) अज्ञात व्यक्तींकडून गोवंशाची कत्तल करून अडीच ते 3 किलो मांस सज्जाद इब्राहिम बेडेकर यांच्या रुममध्ये राहणार्या जमाल जामीमुद्दीन मिहार यांनी खाण्याकरिता आणला होता. याची माहिती रोहा पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांनी रात्री उशिरा त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याचे मांस खाण्याकरता जवळ बाळगल्याप्रकरणी रोहा पोलिसांनी जमाल जालीमुद्दीन मिहार (32) व गोमांस विक्री करणार्या दोन अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, यातील जमाल जालिमुद्दिन मिहार याला अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.