दसऱ्याच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन

| उरण | वार्ताहर |

जिल्ह्यात दसरा सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी दसरा गणेशोत्सव साजरे करतात. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गणेशमूर्ती विराजमान होते. ही प्रथा अनेक वर्षापासून जिल्हयात सुरु आहे. अशीच परंपरा पनवेल तालुक्यातील वहाळ गावात पाटील बंधू व मित्र परिवार वहाळ यांच्या तर्फे गेली 16 वर्षे अविरतपणे सुरू आहे. यंदाचे दसरा गणेशोत्सवाचे हे 17 वे वर्ष आहे. या ठिकाणी दररोज आरती, महाप्रसाद, सामुदायिक हरिपाठ व भजन असे धार्मिक य कार्यक्रम पार पडले. गणेशोत्सवात पर्यावरण पुरक अशा नैसर्गिक साहित्यांचा वापर करण्यात आला होता. दि.24 रोजी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची गुरुवार दि.26 रोजी विसर्जन करण्यात आले.

Exit mobile version