कवितेत सौंदर्य वाढविण कवीची कला

| पेण । वार्ताहर ।
कविता ही श्रोत्यांना अधिक आवडावी यासाठी कवितेचा विषय आणि सौंदर्य शोधून तेथे भरून कविता आनंद देणारी करावी असे प्रतिपादन राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य प्रा. एल.बी.यांनी खारढौबी येथे केले. कविसंमेलनात गझलकार रघुनाथ पवार, संध्या दिवकर, काशिनाथ मढवी, चंद्रकांत पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, दिनानाथ पाटील, शोभा जोशी, मोहन पाटील, हिरामण पाटील, मीनल माळी, रामचंद्र म्हात्रे, प्रशांत पाटील, हनुमंत शिंदे,भगवान म्हात्रे, जयंत जांभुळकर, के पी.पाटील, हरिश्‍चंद्र माळी,अनंत पाटील, संजीव म्हात्रे, निरंकार पाटील अरुण म्हात्रे,बी एन पाटील इत्यादी कवींनी कविता सादर केल्या.कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती केली होती. सदानंद ठाकूर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

Exit mobile version