| मुंबई | प्रतिनिधी |
चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. यातील आरोपी मनोज गरबडे याच्यावर कलम 307 अर्थात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन गृहमंत्रालयावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर आता हे कलम मागे घेण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांना दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पुण्यातील 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच आरोपी मनोज गरबडे याच्यावर कलम 307 लावण्यात आलं होतं. याप्रकरणी आता खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांवरील निलंबन मागे घेतलं असून आरोपीवरील कलम 307 मागे घेण्यात आलं आहे.