संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेचा पुढाकार
पनवेल | वार्ताहर |
संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई इथे एक कलाकार, लोककलावंत ह्यांचा आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनात नवी मुंबई व रायगडच्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. गेली 17 महिने घरी बसून आहे, तरी रंगभूमी खुली करावी आणि कलाकार ह्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काही मागण्याचे निवेदन शासनाला देण्यात आले. सदर मोर्चाचे निमंत्रक हे लावणी महासंघ, मुंबई होते. तसेच यावेळी संगीत एकता रायगड ह्या संस्थेच्या कलाकार मोठ्या संख्येने मोर्च्यामध्ये सामील झाले होते.