आर्य म्हात्रेचे दमदार शतक

Cricket wickets,ball and bat

। पेझारी । वार्ताहर ।

झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या शष्टब्दी पूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित बारा वर्षा खालील लेदर बॉल एकदिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाचा सलामीचा फलंदाज आर्य म्हात्रे यांनी स्पर्धेतील तिसरं शतक आपल्या नावावर केलं. दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा संघा विरुद्ध खेळतांना आर्यने 125 चेंडूत 9 चौकरांच्या सहायाने नाबाद 100 धावा काढल्या. प्रथम फलंदाजी करताना पीसीए पनवेल संघांनी 40 षटकांच्या समाप्ती नंतर 7 गडी बाद 257 धावा धावफलकावर नोंदवल्या. सलामीच्या फलंदाजीसाठी आलेल्या आर्य म्हात्रे नाबाद 100 तर पार्थ पवार 36 व विघ्नेश पाटील यांनी 28 धावा काढून आर्यला साथ दिली. रोहा संघाकडून हृषीकेश पिंपळकर यांनी 2 गडी बाद केले. प्रतिउत्तर देताना दिशा क्रिकेट अकॅडमी रोह्याचा संघ सर्व गडी गमावत 114 धावांची मजल मारू शकला, दर्श यांनी 4 गडी बाद केलं तर अजिंक्य कैया 3, ओंकार रक्षिकर आणि पार्थ देवकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघांनी सामना 143 धावांनी एकतर्फी जिंकला. आर्य म्हात्रे सामनावीर, हृषीकेश पिंपळकर स्टार अपोनंट तर दर्श यांनी स्पर्धेतील पहिली हॅटिट्रक काढली. त्याला मोस्ट इमर्जिंग प्लेअर म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version