आशा व गटप्रवर्तक जाणार बेमुदत संपावर

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर जोरदार निदर्शने

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन द्या. 26 हजार किमान वेतनाबरोबरच गटप्रवर्तक महिलांना दरमहा 8 हजार 450 रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता द्या. ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करा. दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्या. इत्यादी मागण्यांच्या घोषणांनी रत्नागिरी जिल्हा परिषद परिसर दणाणला. जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठले यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिला 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्यामुळे कोणत्याही महिलेस त्रास देऊ नये अन्यथा महिला हे सहन करणार नाहीत. असे शिष्टमंडळाच्या वतीने ठणकावून सांगण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठले यांनी असेही सांगितले की, यापूर्वी माझे कुटुंब माझी रत्नागिरी यातील केलेल्या कामाचा मोबदला लवकरच अशांना गटप्रवर्तकांना देण्यात येईल. आठ महिला कार्यकर्त्यांच्यावर दाखल करण्यात आलेलय तक्रारी काढून घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येईल. निवडणुकीचे काम ज्या आशा कर्मचाऱ्यांनी केले आहे त्याचाही फरक त्यांना देण्यात येईल असे डॉ. आठले स्पष्ट केले. जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील संप मागे घेण्यात येणार नाही. संपातील मागण्यांचे बाबत समाजाचे प्रबोधन होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढून निदर्शने करावी, असेही पुजारी यांनी सभेमध्ये सांगितले. सदर आंदोलन संघटित आशा गटप्रवर्तक महिला नेत्या विजया शिंदे, विद्या भालकर, पल्लवी पारकर, संचिता देसाई, धनश्री जाबरे अनुष्का मोरे, सोनाली बाइत आयेशा बागवान आदी उपस्थित होत्या.

Exit mobile version