| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि.5) वारी काढली होती. यावेळी ताज हॉटेलचे मॅनेजर किशोर रानवडे तसेच एक्झिक्युटिव्ह ऑफिसर चेतन मांडलिक उपस्थित होते. या वारीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका कविता गायकवाड तसेच दीपक पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक रश्मी राऊत यांनी आभार मानले.