शिवजयंतीच्या अध्यक्षपदी आशिष गोवारी

। उरण । वार्ताहर ।

उरणमध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याबाबत शिवसेना शहर शाखेमध्ये नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये आशिष गोवारी यांची 2024 शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड होताच आशिष गोवारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर व गणेश शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आशिष गोवारी यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, वैभव करंगुटकर, प्रवीण तळी, राजेश निकम, संदेश पाटील, निखिल पाटील, सोहम श्रीधर धनकर, राज शिंदे, प्रफुल शहा व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version