। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने जिल्हाप्रमुख व मा.आ. मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी समीर जाधव यांना जाब विचारला आहे. यावेळी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
उरण शहर शाखेतून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेत जाऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, स्वच्छतागृहांची दुरवस्था, रस्त्यांची दुरवस्था, विमला तलावातील तुटलेला कठडा, इमारतींच्या नियमानुसार न होणार्या बांधकामासंदर्भात प्रशासनाची उदासीनता या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्याधिकारी समीर जाधव यांनी या समस्यांचा सखोल अभ्यास करून लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी मा.आ. मनोहरशेठ भोईर यांच्यासह नरेश रहालकर, संतोष ठाकूर, गणेश शिंदे, विनोद म्हात्रे, ममता पाटील, महेंद्र पाटील, सुजाता गायकवाड, आशिष गोवारी, अतुल ठाकूर, मनीषा ठाकूर, वंदना पवार, समीर मुकरी, कैलास पाटील, गणेश पाटील, कविता गाडे, अरविंद पाटील, संदीप जाधव, प्रवीण मुकादम, रसिका पाटील, करुणा वेळे, कटाक्षी राव, तसेच शिवसेनेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.