अशोक कदम यांचे निधन

सुकेळी | वार्ताहर |
तामसोली- सावरट सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबुराव कदम (वय 57) यांचे पुणे येथे अपघाती निधन झाले. नोकरीनिमित्ताने ते 11 वर्षांपासून मेडीपाँईट संजीवनी हॉस्पिटल औंध पुणे येथे औषधांची डिलेव्हरी करण्याचे काम करत होते. अशोक कदम यांच्यावर सावरट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी सोमवारी.11 तर उत्तरकार्य बुधवारी 13 ऑक्टोबर रोजी सावरट येथे होणार आहे.

Exit mobile version