महाड | प्रतिनिधी |
रामवाडी घावरेकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताहचे औचित्य साधून श्रीराम विकास मंडळ मुंबई-पुणे-बडोदे-फौजि-जंगमवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावकरी व सैन्य तसेच पोलीस दलातील निवृत्त अधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार भरत गोगावले, जि.प.सदस्या निकिता ताठरे, सीताराम कदम, गोसावी, उदय लेंगारे, डॉ. माने, सुभेदार नामदेव कदम, तसेच सत्कारमूर्ती सरपंच सुनिता सुतार, उपसरपंच सतीश जाधव, कॅप्टन महिपत शिंदे , ज्ञानदेव सकपाळ, जयराम सुतार अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना शिंदे, सन्मान सोहळा मानकरी विष्णु दळवी, हवालदार संजय जंगम, सुरेश जंगम, सहदेव कदम ,नामदेव भोसले, अशोक सकपाळ,सिताराम शिंदे, राकेश कदम ,समीर उतेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयुक्त कृती समिती अध्यक्ष ह.भ.प. तुकाराममहाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष दिनकर जाधव, सरचिटणीस शिवाजी कदम,विशेष कार्यकारी संचालक: आनंद महाराज कदम, मनोहर भोसले, अशोक शिंदे,विष्णु महाराज सपकाळ ,कॅप्टन दत्ताराम शिंदे, नारायण जाधव, रामभाऊ सुतार, संतोष जाधव, शशिकांत दळवी, वासुदेव कदम यांनी विशेष मेहनत घेतली.