। तळा । वार्ताहर ।
तळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.अशोकशेठ लोखंडे यांचा चौतिसावा स्मृतिदिन समारंभ अशोक ल.लोखंडे विद्या मंदिर पिटसई येथे साजरा करण्यात आला यावेळी खा. सुनील तटकरे यांनी कै.अशोकशेठ लोखंडे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशात तळा तालुक्याचे नाव लौकीक करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.मी एक ठराविक रक्कम या शाळेला देणार आहे.या रक्कमेच्यायेणार्याव्याजाने शिक्षकांनी परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचप्रमाणे मालूक- पिटसईकोंड आणी रहाटाडवाडी ते रहाटाड रस्ता येत्या कालावधीत जिल्हा नियोजनमधून पूर्ण करून घेऊ जेणे करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सुलभ होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या समारंभास अशोक ल.लोखंडे विद्यामंदिर विश्वस्त वसंतशेठ लोखंडे, विश्वस्त महादेव गोळे, अलका अशोक लोखंडे,निखिल लोखंडे,नाना भौड,मारुती शिर्के,संस्था अध्यक्ष कृष्णा पंदेरे,सदस्य खेळू वाजे, गणपत जगताप, ठाकर गुरुजी,रमेश पिंपळे,ह्दय रेडिज,लक्ष्मण जाधव पीटसई विभाग ज्ञान प्रसारक मंडळ कार्यकारणी सदस्य व सर्व सभासद उपस्थित होते.
अशोकशेठ लोखंडे स्मृतीदिन
