| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखांच्या वतीने विद्या प्रबोधिनी या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य बी. के. पटेल, महादेव बैकर, राजू सप्रे, वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भगवान लोखंडे, मुख्याध्यापक धुमाळ सर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भगवान लोखंडे यांनी विद्या प्रबोधिनी या उपक्रमामागील उद्देश सांगितला. विद्या प्रबोधिनी हा उपक्रम काही वर्षांपासून द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यान्वित आहे. या माध्यमातून शिक्षक, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी आप आपल्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती व ज्ञान याबाबत अद्ययावत रहाण्याच्या दृष्टीने संवादी व्हावे, त्यांचा आंतर विद्याशाखीय दृष्टीकोन वाढीस लागावा, विषय मांडणीचे कौशल्य अधिक वृद्धिंगत व्हावे हा या विद्या प्रबोधिनी मागील प्रधान हेतू असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी प्राध्यापक डॉ. दिवाकर कदम यांनी वैश्विक मानवी मूल्य या विषयाची मांडणी केली.
या उपक्रमात दर महीन्याच्या दुसर्या शनिवारी दुपारी 12:30 वाजता आपल्याच कर्मचारी वर्गापैकी एक जण त्यांचे अभ्यासाचे विशेष क्षेत्र असलेल्या एखाद्या घटकांवर व्याख्यान देतील उपस्थित शिक्षक त्यावर चर्चा करतील व एखाद्या अनोळखी विषयाशी संवादी होतील असे नियोजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल सर्जे, दौडमनी, महाडकर, डी. टी. आंबेगावे आदी शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या कार्यक्रमाचे निवेदन डॉ दत्ता कुटेंवाड यांनी केले तर आभार श्री सुहास वावेकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ नवनाथ गायकवाड यांनी कार्य केले. याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व वरिष्ठ महावद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.