पोलीस निरीक्षक शिरीष पवारांचे मार्गदर्शन
| खोपोली | प्रतिनिधी |
ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थीदशेत खूप अभ्यास करा, वाईट मित्रांची संगत करू नका, आईवडीलंच तुमचे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करा. आयुष्यात मोठे व्हायचं असेल तर चांगली संगत, नोकरी, आयुष्याचा जोडीदार या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी शिशुमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले आहे.
ऑक्टोबर गांधी सप्ताहानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी आणि सर्व पदाधिर्यांच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतानाच पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचे विद्यार्थ्यांना साबयर गुन्ह्यासंबंधीचे व्याख्यान डॉ. रामहरी धोते शिशुमंदीर स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी लायन्सच्या अध्यक्षा शिल्पा मोदी, शिशुमंदिर स्कूलचे अध्यक्ष विजय चुरी, प्रिन्सीपल झांसी आयाप्पन, सुनिता चव्हाण, लायन्सचे पदाधिकारी ला. संगिता पिल्ले, ला. शैली मेहता, ला. प्रदीप मोहता, ला. अविनाश राऊत, ला. पल्लवी पडवळकर, ला. सुजित पडवळकर उपस्थित होते.
कोव्हिड मुळे माणसाची दिशा बदलेली आहे. ज्या मुलांच्या हातात मोबाईल आला, त्यांना चांगले वाईट गुणांची महितीही मिळू लागली. गुगल तुमच्या आवडीनुसार महिती दाखवतो, तर अनोळखी माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर एक्स्पेस्ट करू नका, काही घडल्यास आईवडिलांना सांगा किंवा पोलिसात या अशी अनेक उदाहरणे शिरीष पवारांनी देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार हेमलता देशमुख यांनी व्यक्त केले.