असिफ इलेव्हन पाली संघ ठरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट चषकाचा मानकरी

। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर बुद्रुक येथे सिद्धार्थ संघ सामाजिक व सांस्कृतिक मंडळ सिद्धेश्‍वरनगर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेनिस क्रिकेट चषकाचे आयोजन मोंगीलाल ओसवाल या क्रीडांगणावर 15 व 16 जानेवारी 2022 रोजी केले होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 24 संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत असिफ इलेव्हन पाली आणि जय हनुमान आंबेघर या दोन संघात झाली. या अंतिम सामन्यात असिफ इलेव्हन पाली या संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषकावर आपले नाव कोरले. या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक, उपविजेता जय हनुमान आंबेघर संघ 10 हजार रु व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक असिफ इलेव्हन पाली या संघास 5 हजार रु व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ वाय. इ. एस वरवटने हा ठरला. या स्पर्धेतील मालिकावीर आंबेघर संघाचा राजा माळी, उत्कृष्ट फलंदाज तुषार बडे आंबेघर, उत्कृष्ट गोलंदाज मुजिम पाली, क्षेत्ररक्षक माणिक वरवटने या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी समृद्धी यादव, हेमंत गायकवाड, संतोष यादव, सीओन वरसुलकर, रमेश गायकवाड, सागर तायडे, उत्तम मोते, सुरेश गायकवाड, शैलेंद्र गायकवाड, अस्मिता कांबळे तसेच मंडळाचे पदाधिकारी, सिद्धार्थ नगर महिला मंडळ, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Exit mobile version