। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत हे मुंबई व पुण्याच्या अगदी मधोमध असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून दररोज हजारो विद्यार्थी, चाकरमानी, व्यावसायिक प्रवास करीत असतात. मात्र, कोव्हिडच्या काळात बंद केलेल्या गाड्या तसेच बंद केलेले थांबे आणि अन्य समस्या सोडविण्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन साकडे घातले.
माजी मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबई-लातूर ही गाडी पकडण्यासाठी पनवेलमार्गे कर्जत रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान सेलचे कोंकण समन्वयक सुनील गोगटे, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक बेहेरे, तालुका उपाध्यक्ष शर्वरी कांबळे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, दिनेश सोळंकी आदी उपस्थित होते.