| मुंबई | वृत्तसंस्था |
शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आरपीआय पक्षाकडून दावा करण्यात आला होता. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाने स्वतःकडे खेचल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाली का असे त्यांना विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या बदल्यात दिलेले आश्वासन जाहीर करत ते आश्वासन पाळतील अशी आशा आहे. त्यामुळे आता अम्हीणाराज नसून ती जागा सोडली असल्याचे सांगितले.
डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाविषयी विचारणा केली. आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता.
आरपीआय महायुतीत आहे त्यांनी आमचा विचार केलाय. मात्र जागेची अडचण आहे असे आम्हाला सांगितले. शिर्डीच्या जागेसाठी आग्रही होतो. ती त्यांना सोडता आली नाही. मात्र बाकीचे आश्वासन त्यांनी दिलेले आहेत ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे. मनसे महायुतीत आलेली नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडण्याचा निर्णय नाही असे ही आठवले म्हणाले.