। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय आठवले गटाने केला आहे. याबाबतची माहिती रॉयल गार्डन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत रायगड जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे बबन गायकवाड, गणपत गायकवाड, मनोहर ढोले, रमेश खैरे यांनी खूप वर्षे आंबेडकर भवनसाठी स्वखर्चाने मोलाचे कार्य केले आहे. ती जी जागा आहे ती समाजाची अस्मिता आहे. आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी शब्द दिला आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. त्याचवेळी तालुक्यातील आंबेडकरी जनतेची इच्छा असलेल्या त्याच 12 गुंठे जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारले जाईल असा निर्धार बोलून दाखवला.
या पत्रकार परिषदेला आरपीआय आठवले गटाचे तानाजी गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, वर्षा चिकने, रमेश खैरे, अमर जाधव, सचिन भालेराव, भालचंद्र गायकवाड, अनंता खडागळे, दिनेश गायकवाड, नरेश गायकवाड, सुशील जाधव, अमर जाधव, विशाल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.